अस्मिता
अमृतपुत्र शैक्षणिक पालक योजना
अमृताभिनंदन योजना

दृष्टिकोन

आम्ही अपंग व्यक्तींना ‘अपंग’ नाही…. ‘अमृतपुत्र/अमृतकन्या’ मानतो. संस्थेच्या स्थापने पासून ते आजपर्यंतच्या प्रवासात आम्हाला हे लक्षात आलंय की कोणत्याही अपंग व्यक्तीला सक्षम करण्यासाठी मदतीची नाही….फक्त थोड्या सहकार्याची गरज असते.आम्ही ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.

ध्येय

जी अपंग व्यक्ती केवळ तिला न मिळालेल्या योग्य वातावरणामुळे नीट शिक्षण घेऊ शकली नाही आणि त्यामूळे आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल व दुर्लक्षित राहीली, अशांच्या मुलांना/ मुलींना सर्वोत्तम शिक्षण मिळालं तरंच त्यांची येणारी ही पिढी खऱ्या आर्थने प्रगत होईल आणि ओघाने आपला समाज एक पाउल पुढे सरकेल.

उद्देश

अमृतपुत्र/अमृतकन्या चा मानसिक,सामाजिक व आर्थिक स्तर उंचावणे आणि त्याद्वारे त्यांनाही एका सामान्य व्यक्तीप्रमाणे उत्तम आयुष्य जगण्याच्या संधी उपलब्ध करून देणे.

अमृतकेंद्र उपक्रम

शैक्षणिक कार्य

अस्मिता संचालित जमनाधर अग्रवाल माध्यमिक विद्यालय राममनोहर केडिया प्राथमिक विद्यालय जोगेश्वरी(पूर्व) येथे वेस्टर्...

वैद्यकिय कार्य

ओर्थोपेडीक सर्जरीज व मार्गदर्शन तज्ञ ओर्थोपेडीक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी व आवश्यकतेनुसार उपचार व सहाय्य के...

रोजगार प्रशिक्षण व मार्गदर्शन

उत्पादन निर्मिती सेंटरवर येणाऱ्या प्रत्येक अमृतपुत्र/ अमृतकन्ये मध्ये एखादी कला व कौशल्य दडलेलं असतं. ते ओळखून त्...

सांस्कृतिक कार्य

हम भी किसीसे कम नही संगीत व नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. या संगीत व नृत्य कलेत निपुण असलेल्या काही अम...

मदत नको, सहकार्य करा.

अनमोल योगदान

इतक भरीव सामाजिक योगदान करूनही अस्मिता चे सर्वेसर्वा दादा पटवर्धन व केंद्र प्रमुख सुधाताई वाघ यांच्या बोलण्यात आज ही तीच नम्रता आणि हळुवारपणा आहे जो संस्था स्थापनेच्या वेळी होता. ते नम्रपणे हे वारंवार नमूद करतात की सर्वांची नावं इथे घेणे शक्य नाही पण या संपूर्ण प्रवासात वेळोवेळी संपर्कात आलेले विचारवंत, क्षमतेनुसार मदत करण्यास तयार झालेले आपल्याच समाजातील विविध लोक व सामाजिक जाणीवेतून पडेल ते काम करण्याची तयारी दाखवणारे आणि करणारेही अस्मिताचे कार्यकर्ते या सर्वां शिवाय अस्मिता इथंवर पोहचूच शकली नसती.

श्री विष्णू पटवर्धन

संस्थापक व  उपाध्यक्ष

श्री जगदीश सामंत

कार्याध्यक्ष  

सौ. सुधा वाघ

केंद्र प्रमुख

काळाप्रमाणे आपणही आपल्यात बदल केले पाहिजेत, ही दादांची शिकवण वंद्य मानून अस्मिताने वेळोवेळी काळाच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे आपल्या कार्याच्या स्वरूपात बदल घडवून आणले पण 'अपंगाचे हित' ह्या मूळ उददेश कधीच बाजूला सरु दिला नाही.